कोल्हे गट

कोपरगावच्या विकासावर वरवंटा फिरविणाऱ्या काळे कुटुंबाचा विळखा जनता तोडणार – पंडितराव भारुड

कोपरगावच्या विकासावर वरवंटा फिरविणाऱ्या काळे कुटुंबाचा विळखा जनता तोडणार – पंडितराव भारुड
कोपरगावच्या विकासावर वरवंटा फिरविणाऱ्या काळे कुटुंबाचा विळखा जनता तोडणार – पंडितराव भारुड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० ऑक्टोबर २०२४-आशुतोष काळे यांचे एकही ठोस काम जनतेला दिसत नाही आणि रस्ते वीज पाणी या समस्या अक्षरशः टोकाला गेल्या आहेत.तालुक्याचे पाणी घालवणारे काळे कुटुंब आहे पण ओढून ताणून आपले पाप झाकण्याचा प्रयत्न ते करतात.युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नाही तर या उलट पंचवीस हजार कुटुंबाला रोजगार मिळण्यापासून वंचित ठेवले.ज्यांचे काम फक्त घालवणे आहे त्या काळे कुटुंबाचा हा तालुका मागे घेऊन जाण्यासाठी पडलेला विकासाच्या अधोगतीचा विळखा जनता येत्या काळात तोडून फेकणार आहे अशी सणसणीत टीका कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक पंडितराव भारुड यांनी केली आहे.

जाहिरात
कोपरगाव औद्योगिक वसाहत विकसित होते आहे.१४ कोटीहून अधिक रकमेचे अंतर्गत रस्ते आणि सुविधा यांचे काम चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी निधी प्राप्त करत सुरू केल्याने काळे यांचे तालुक्यातील काहीही काम न झाल्याचे पाप उघडे पडेल या भीतीने ते बोलत आहेत. अपरिहार्यता झाल्याने राजकीय सामाजिक कार्याची उंची नसलेल्या लोकांच्या नावाने प्रेस नोट काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.जर रोजगार प्रश्नावर काळे कुटुंबाने कधी काम केले असते तर कोल्हे कुटुंब करत असलेल्या कामावर बोलण्याची बालिशपणाची सूचना त्यांनी कुणी केली नसती.

जाहिरात
मुळातच कोल्हे कुटुंब हे रोजगार देणारे आहे हिरावून घेणारे नाही. दुसरीकडे काळे यांनी औद्योगिक वसाहतच्या परिसरात त्यांची एक संस्था आहे तिथे बाहेरील राज्याचे मजूर आणून स्थानिकांना रोजगरापासून दूर का ठेवले याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.कोपरगाव तालुक्यातील हजारो युवक नोकरीला लागले तर काळे यांचे दोन नंबरचे धंद्यांना असणारे प्रोत्साहन आणि त्यातून निर्माण होणारे मोफतचे कार्यकर्ते त्यांना मिळणार नाही याची चिंता आमदार महोदयांना वाटत असावी असा खोचक प्रश्न भारुड यांनी केला आहे.

जाहिरात मुक्त
कोपरगामध्ये नवीन उद्योग का येत नाही तर याचे उत्तर आमदार आशुतोष काळे यांना घरातच मिळेल त्यांनी समन्यायीचे पाप आपल्या कुटुंबाने का केले याचे आत्मचिंतन करावे.उद्योगाला पाणी आणि सुरक्षा लागते या दोन्ही प्रश्नात तुम्ही अधोगती केली आहे.पाणी घालवले आणि अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी यामुळे बाहेरून कुणी उद्योग घेऊन येण्यास तयार होत नाही कारण पूर्वी दहा वर्षे आणि आता परत पाच वर्षे काळे कुटुंबाचे अभय असणारे लोक कायदा सुव्यवस्था ढासाळवत आहेत त्यामुळे हा विळखा आता जनताच सोडवेल असेही भारुड म्हणाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे