कोल्हे गट

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोकाट जनावरे सोडून अवमान ; शिवप्रेमींनी केला आ.काळे आणि प्रशासनाचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोकाट जनावरे सोडून अवमान ; शिवप्रेमींनी केला आ.काळे आणि प्रशासनाचा निषेध
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोकाट जनावरे सोडून अवमान ; शिवप्रेमींनी केला आ.काळे आणि प्रशासनाचा निषेध
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ ऑक्टोबर २०२४कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोकाट जनावरे कोंडण्याचा गैरप्रकार करून अस्मितेला धक्का लावण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने मोकाट जनावरांनी गेल्या अनेक वेळा नागरिकांना जखमी केल्याचे अनेक उदाहरणे ताजे आहे.जर उद्यानात या जनावरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काही धक्का लावला आणि अवमान झाला तर त्यालाही प्रशासन आणि आमदार जबाबदार असतील अशी भूमिका शिवप्रेमींनी व्यक्त केली.

जाहिरात
कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांचे जीवनमान आधीच अडचणीचे करून लोकप्रतिनिधी जनतेच्या भावनांशी खेळत आहे त्यातच आता अगदी महापुरुषांच्या अस्मितेचा देखील अवमान करण्याचे पाप सद्या सुरू आहे.पालिका प्रशासन मोकाट आहे कारण त्यांना आमदार काळे यांचा धाक नाही.मिले सूर मेरा तुम्हारा असे असल्याने केवळ टक्केवारीत व्यस्त असल्याने असे दुर्दैवी प्रकार शहरात सुरू आहे.उद्यानात नासाडी होऊन अनेक झाडे खराब झाली आहेत त्यात पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये काढले जातील.या जनावरांसाठी कोंडवाडा मंजूर आहे तर तो निधी गेला कुठे ? वारंवार जनावरे पकडण्यासाठी पैसा जनतेचा वापरला जातो हे पालिका विसरून कारभार करत असेल तर शहरात नक्की कारभार कोण चालवते आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवप्रेमी दत्ता काले,राजेंद्र बागुल,वैभव गिरमे, विवेक सोनवणे, खालील कुरेशी,रंजन जाधव, फकिरमंहमद पहिलवान, संतोष साबळे, पप्पू पडीयार, प्रमोद नरोडे,जगदीश मोरे,रोहित कणगरे, सतीश निकम, शंकर बिऱ्हाडे, रोहन दरपेल,अजय शार्दूल,संजय तुपसैदर, सलिम पठाण यांनी या घटनेचा निषेध नोंदवत चोवीस तासात उद्यान सुरळीत केले नाही तर अधिक परखड भूमिका घेऊ असे आवाहन पालिकेला केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे