आपला जिल्हाविखे-पाटील

लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटीबद्ध – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटीबद्ध – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर तालुक्यातील ५४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

शिर्डी विजय कापसे दि.११ ऑक्टोबर २०२४तरूण, महिला, कामगार, ज्येष्ठ नागरिक व वंचित घटकांच्या कल्याणासाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात

संगमनेर येथे आयोजित नारीशक्ती सन्मान व ५४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, उपविभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी अधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकडे पाऊल टाकले आहे. या योजनेतील लाभापासून वंचित महिलांना सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांचे पैसे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेत संगमनेर तालुक्यात १०१ कोटी रूपयांचा लाभाचे वितरण करण्यात आले आहे. पीक विमा, दूध अनुदान योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहेत.

जाहिरात

शासनाने अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचे मानधन वाढविले. महिलांना एसटी भाड्यात पन्नास टक्के सवलत दिल्याने तोट्यातील एसटी फायद्यात आली‌‌‌ आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन भेट योजनेतून येत्या काळात जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या यात्रा घडवून आणली जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जलजीवन जीवन मिशनच्या १५ कोटींच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. काही महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात फुड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार आवश्यक साधने व उपकरणे वाटप या योजनेतील ४०० लाभार्थांपैकी एका कामगारांला प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात बॅंक कर्जाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पल्लवी रूपवते, कल्पना भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संगमनेर तालुक्यात १ लाख ३५ हजारपेक्षा जास्त लाभार्थी असल्याची माहिती प्रास्ताविकात तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे