संजीवनी बचत गटाचा नवरात्रोत्सव ठरला महिला भगिणींचा हक्काचा उत्सव
संजीवनी बचत गटाचा नवरात्रोत्सव ठरला महिला भगिणींचा हक्काचा उत्सव
दसरा सणानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान करणार महिषासुर दहन
कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑक्टोबर २०२४– नवरात्री निमित्ताने संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट आयोजित शारदीय नवरात्रौत्सव सन्मान नारीशक्तीचा अभिमान नारीशक्तीचा अन्यायाला उलथून टाकण्याची क्षमता असणारे आदी शक्तिचा हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका ताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरातील आणि परिसरातील महिलांसाठी दांडिया उत्सव साजरा करण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले होते. हजारो महिलांनी या नवरात्रोत्सवाचा आनंद घेत आपल्या दैनंदिन व्यापातून विरंगुळा म्हणून या कार्यक्रमास हजेरी लावली. शेकडो बक्षिसे, रोज लकी ड्रॉ तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत संजीवनीने दर्जेदार नवरात्रोत्सव घेत संस्कृतीचा आदर्श जपला आहे.
सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे कोल्हे कुटुंब समाज हिताचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करते. कोपरगाव तहसील मैदान परिसरातील शेकडो महिला भगिनी या दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. आपल्या महिला भगिनींची सुरक्षा त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक हा खऱ्या अर्थाने कोणत्याही सण-उत्सवाचा उद्देश असायला हवा हा हेतू रोज साध्य झाला.