तिसऱ्या दिवशी ११ इच्छुकानी नेले १३ उमेदवारी अर्ज तर संजय काळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
आज अखेर ५२ इच्छुकांनी ७४ उमेदवारी अर्ज नेले आहे तर २ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२४-कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मंगळवार दि २२ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी २७ इच्छुक उमेदवारांनी ३९ उमेदवारी अर्ज नेले होते, तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी १४ इच्छुक उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज नेले होते तर आज तिसऱ्या दिवशी ११ इच्छुक उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज नेले असून आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघात संजय भास्करराव काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपले नामनिर्देशन पत्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांच्याकडे दाखल केले आहे.
जाहिरात
आज गुरुवार दि २४ ऑक्टोबर रोजी नितीन भानुदास औताडे (पोहेगाव १ अर्ज) अनिल शिवाजीराव गायकवाड (कोपरगाव १ अर्ज) दिलीप चिंतामण लासुरे (माहेगाव देशमुख २ अर्ज) देविदास दगडू गव्हाणे (अंजनापूर १ अर्ज) हनुमंत बळीराम सावंत (कोपरगाव १ अर्ज) सतीश बाबुराव काकडे (कोपरगाव १ अर्ज) शंकर सुखदेव लासुरे (कोपरगाव १ अर्ज) शिवाजी पोपटराव कवडे (कोकमठाण २ अर्ज) संजय भास्करराव काळे (कोपरगाव १ अर्ज) संजय शिवाजी मंडलिक (रवंदे १ अर्ज) तर मंगेश चंद्रभान औताडे (कोळगाव थडी १ अर्ज) असे एकूण ११ इच्छुक उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज नेले आहे.संजय काळे अर्ज दाखल करतांना