करंजीचे आबासाहेब शिंदे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन
आबासाहेब शिंदे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन
कोपरगाव विजय कापसे दि २५ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील प्रतिष्ठित नागरिक आबासाहेब रामजी शिंदे यांचे आज शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ६.३० वाजता करंजी अमरधाम येथे होणार आहे.
कै. आबासाहेब शिंदे हे करंजी गावासह कोपरगाव तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित होते. तसेच ते माजी आमदार कै.के.बी रोहमारे व सहकार महर्षी कै. शंकरराव कोल्हे साहेबांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय होते. त्यांनी कोपरगाव टीडीपीचे संचालक पद, करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच करंजी ग्रामपंचायतचे सदस्य असे अनेक मानाची पदे भूषवित आपल्या कार्य कर्तुत्वाच्या ठसा जनसामान्या मध्ये उमटविला होता. त्यांच्या जाण्याने संपूर्ण शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै आबासाहेब शिंदे हे करंजी गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील लक्ष्मण शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब शिंदे व निर्मला ढमाले यांचे वडील होते तर करंजी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, भाऊसाहेब शिंदे, अनिल शिंदे यांचे ते चुलते होते. त्यांच्या पश्चात सुना,नातवंडे असा असा मोठा परिवार आहे.