आपला जिल्हानिधन वार्ता
करंजीच्या शांताबाई आबासाहेब शिंदे यांचा उद्या दशक्रिया विधी
करंजीच्या शांताबाई आबासाहेब शिंदे यांचा उद्या दशक्रिया विधी
करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा टीडीबीचे माजी अध्यक्ष आबासाहेब रामजी शिंदे यांच्या पत्नी
कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२४–कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा टीडीबीचे माजी अध्यक्ष आबासाहेब रामजी शिंदे यांच्या पत्नी शांताबाई आबासाहेब शिंदे यांचे वृद्धपकाळाने शनिवार दिनांक ८ जून रोजी दुखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी आज सोमवार दिनांक १७ जून रोजी करंजी येथे होणार असून या प्रसंगी ह.भ.प संगीता महाराज चव्हाण यांचे प्रवचन होणार आहे.
कै. शांताबाई शिंदे या करंजी गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब शिंदे व निर्मला ढमाले यांच्या मातोश्री तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, भाऊसाहेब शिंदे व अनिल शिंदे यांच्या चुलती होत्या त्यांच्या पश्चात सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.