१९ उमेदवारांचे २९ नामनिर्देशन पत्र वैध तर १ नामनिर्देशन पत्र अवैध-निवडणूक निर्णय अधिकारी सोळंके
१९ उमेदवारांचे २९ नामनिर्देशन पत्र वैध तर १ नामनिर्देशन पत्र अवैध-निवडणूक निर्णय अधिकारी सोळंके
१९ उमेदवारांचे २९ नामनिर्देशन पत्र वैध तर १ नामनिर्देशन पत्र अवैध-निवडणूक निर्णय अधिकारी सोळंके
कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑक्टोबर २०२४–कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी करता २२ ऑक्टोबर पासून इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होऊन काल मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत इच्छुक २० उमेदवारानी ३० नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यातील छाननी प्रक्रिया मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असून यात दाखल ३० नामनिर्देशन पत्रांमधून १ उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे तर उर्वरित २९ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती कोपरगाव विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाकरीता इच्छुक २० उमेदवारांनी ३० नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंखे यांच्या कडे दाखल केले होते यात पुणतांबा येथील किशोर पवार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे तर उर्वरित १९ उमेदवारांची २९ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले असून आज बुधवार दि ३० ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून माघारीची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत असून त्याच दिवशी ३ वाजेनंतर बाकी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे ३ उमेदवारांचे अर्ज वैध
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
आशुतोष अशोकराव काळे (माहेगाव देशमुख)समाजवादी पार्टी
मेहबूबखा अहमदखा पठाण (कोपरगाव)नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
वर्पे संदीप गोरक्षनाथ (कोपरगाव )
नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या ३ उमेदवारांचे अर्ज वैध (राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त पक्ष्यांच्या व्यतिरिक्त)
बळीराजा पार्टी
कवडे शिवाजी पोपटराव (कारवाडी कोकमठाण)वंचित बहुजन आघाडी
शकील बाबुभाई चोपदार (महादेव नगर कोपरगाव)राष्ट्रीय समाज पक्ष
शंकर सुखदेव लासुरे (खिर्डी गणेश)
तर अपक्ष १३ उमेदवारी अर्ज वैध
अहिरे प्रभाकर भाऊजी (मोर्विस)
किरण मधुकर चांदगुडे (चासनळी)
खंडू गहिनीनाथ थोरात (जवळके)
चंद्रहस अण्णासाहेब औताडे (पोहेगाव)
दिलीप भाऊसाहेब औताडे (जेऊर कुंभारी)
बाळासाहेब कारभारी जाधव (कोकमठाण)
मनीषा राजेंद्र कोल्हे (पोहेगाव)
राजेंद्र माधवराव कोल्हे (पोहेगाव)
विजय सुधाकर जाधव (मुर्शतपुर)
विजय सुभाष भगत (कोपरगाव)
विजय नारायणराव वडांगळे (कोपरगाव)
विश्वनाथ पांडुरंग वाघ (चितळी, राहता)
संजय भास्करराव काळे (कोपरगाव)