आमदार आशुतोष काळेकाळे गट
विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची राज्यात ओळख करणासाठी कटिबद्ध- आ अशुतोष काळे
विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची राज्यात ओळख करणासाठी कटिबद्ध- आ अशुतोष काळे
विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची राज्यात ओळख करणासाठी कटिबद्ध- आ अशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि १ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करून केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विकसित कोपरगाव मतदार संघ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल आणि हे सर्व आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्यातून सहजपणे शक्य असुन त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी दिपावली सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपावली फराळ कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून परमश्रद्धेय राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंतीदीदी, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी यांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण ब्रह्मकुमारी परिवाराला व मतदार संघातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा देतेप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी आमदार काळे यांनी बोलताना सांगितले की, दिपावली सण हा आनंदाचा, उत्साहाचा सण असून आपल्या सर्वांना सुख, समृद्धी लाभावी. माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला संधी दिली त्यामुळे मतदार संघाचा विकास करू शकलो. या पाच वर्षात मतदार संघातील सर्वसामान्य नागरीकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विकासाच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झालो. पाच वर्षापूर्वी जी काही आश्वासने दिली त्यातील बहुतांश आश्वासने पूर्णत्वास नेली असून काही पूर्णत्वाकडे जात आहेत. यापुढील काळातही मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून माझी वाटचाल सुरु आहे. आपल्याला आपला कोपरगाव मतदार संघ राज्यात नंबर एकवर घेवून जायचा आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित असून पुन्हा एकदा नक्की संधी द्याल याचा मला विश्वास आहे. दीपोत्सवाचं हे आनंदमय पर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात मांगल्य, समृद्धी आणि निरोगी आरोग्य घेऊन येवो. तुमच्या आशा-आकांक्षा आणि केलेले संकल्प लवकरात लवकर पूर्ण होवून आपण सदा सर्वदा आनंदी राहावे अशा सदिच्छा आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केल्या.
विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेल्या आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असून आपले सण उत्सव निसर्गाशी नाते सांगणारे आहेत. प्रकाशाचा सण असणारा दिवाळी सण आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येतो. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करतांना पर्यावरणाची काळजी घेवून स्वच्छते बरोबरच प्रदूषण देखील टाळावे व दिवाळी सण उत्साहात साजरा करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले. यावेळी ब्रह्मकुमारी परिवारातील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.