आमदार आशुतोष काळेकाळे गट

महायुतीचे आशुतोष काळेंच्या वतीने आगामी ५ वर्षाकरिता कोपरगावचे घोषणापत्र जाहीर

महायुतीचे आशुतोष काळेंच्या वतीने आगामी ५ वर्षाकरिता कोपरगावचे घोषणापत्र जाहीर

जुनी गंगा देवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत केला शुभारंभ

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ नोव्हेंबर २०२४महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आशुतोष काळे यांनी आज बुधवार दि ६ नोव्हेंबर रोजी कोपरगाव येथील जुनी गंगा देवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात करून त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आगामी ५ वर्षात कोपरगाव मतदार संघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने “कोपरगावचे घोषणापत्र” जाहीर केले आहे.

जाहिरात

या घोषणापत्रात आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता आगामी ५ वर्षात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, नवीन आरोग्य उपकेंद्र निर्माण करण्याचा वादा, ग्रामीण भागातील शासकीय शाळांचा पुनर्विकास, संगणक आणि ग्रंथालयासह डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा वादा, गोदावरी नदीवर नवीन पूल तयार करण्याचा वादा, शिर्डी ते कोपरगाव, शिंगणापूर ते वैजापूर, कोपरगाव शहर ते रेल्वे स्थानकापर्यंतचे रस्ते आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचे पुनर्निर्माण करण्याचा वादा, आधुनिक स्टेडियम तयार करण्याचा वादा, एमआयडीसीत विविध कंपन्यांकडून उद्योग स्थापन करण्याचा वादा,कृषी सिंचनासाठी थ्री फेज वीज उपलब्ध करणार, नवीन वीज उपकेंद्रे, शेतमालासाठी कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याचा वादा, निळवंडे धरणातून ११ गावांना पाणी पुरवठा करण्याचा वादा यासह अजूनही भौतिक सुविधा पूर्ण करण्याचा वादा  आशुतोष काळे यांनी या घोषणापत्राद्वारे केला आहे.

जाहिरात

तसेच मागील ५ वर्षात अनेक विकासाची कामे पूर्ण करत यातील १५१४ कोटी निधीतून विमातळाचा विकास प्रगतीपथावर,२९१ कोटीतून कोपरगाव शहर पाणीपुरवठा योजनेचे काम,१०० कोटीतून अवकाळी पाऊस, अतिवृष्टीतील पिडीतांसाठी मदत आणि अनुदान,नगर मनमाड रस्त्याचे १९१ कोटीचे काम प्रगतीपथावर, मतदारसंघात ६४.८७ कोटीतून उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर अत्यावश्यक सुविधांना मंजूरी,८८.१५ कोटीतून न्यायालय, ग्रामीण पोलीस स्थानक, २५ तलाठी कार्यालयांसह विविध विकासकामे पुर्ण ९ कोटीतून ब्राम्हणगाव, चांदेकसारे येथे विद्युत उपकेंद्रांसह हजारो ट्रान्सफॉर्मरची उभारणी ११ कोटीतून मतदारसंघातील अनेक मंदिरांचा पुनर्विकास आदी कामेआशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात केली आहेत आणि यापुढेही अशीच विकासकामं करत राहण्याचा वादा देखील आशुतोष काळे यांनी या घोषणा पत्राद्वारे  कोपरगावच्या जनतेला दिला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे