विकास काय असतो हे आमदार आशुतोष काळेंनी दाखवून दिले- विजय त्रिभुवन
विकास काय असतो हे आमदार आशुतोष काळेंनी दाखवून दिले- विजय त्रिभुवन
विकास काय असतो हे आमदार आशुतोष काळेंनी दाखवून दिले- विजय त्रिभुवन
कोपरगाव विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४ :- पाच वर्षात कोपरगाव शहराच्या विकासाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले आहेत. कोपरगाव शहरासह मतदार संघाची आ. आशुतोष काळे यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे विकसित मतदार संघ म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे. हि ओळख ज्यांच्यामुळे निर्माण झाली, ज्यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून दाखवत कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांचा विकास करून, विकास काय असतो हे दाखवून दिले आहे. तोच काम करणारा आमदार पुन्हा निवडून द्यायचा, तो पण मोठ्या मताधिक्क्याने असा निश्चय कोपरगाव शहरासह मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी केला असल्याचे बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहारातील गांधीनगर परिसरात आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आ. आशुतोष काळे उच्च विद्याविभूषित असून त्यांच्या रूपाने विकासाचे व्हिजन असलेलं नेतृत्व कोपरगाव मतदार संघाला मिळाले आहे. सर्व समाजाला व सर्व जाती धर्माच्या नागरिकांना एकत्र घेवून चालण्याचा त्यांचा स्वभाव असून त्यांनी विकासाच्या बाबतीत सर्वच समाजाला न्याय दिला आहे. तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देतांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा उभी करून मतदार संघातील एकही लाडकी बहिण वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. मतदार संघातील जनतेचा एवढा बारीक विचार करणारा नेता आ.आशुतोष काळे यांच्या सारखा कुटुंब प्रमुख आपल्याला मिळाला आहे.
या पाच वर्षात कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील सर्वात महत्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्यांचा प्रश्न देखील निकाली काढून सर्वच रस्त्यांचा विकास केल्यामुळे कोपरगाव शहर विकासात्मक दृष्ट्या पूर्णपणे बदलले आहे. हे जरी खरे असले तरी आपल्याला आ.आशुतोष काळे यांच्याकडून कोपरगाव शहराच्या विकासाचे अजून अनेक प्रश्न सोडवून घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे मात्र त्यांना पुन्हा विधानसभेवर पाठवितांना व झालेल्या विकासाची परतफेड करतांना त्यांना एवढे मताधिक्य दया कि, ते मताधिक्य मोठे असले पाहिजे. निधी आणण्यात त्यांचा हातखंडा आहे मात्र त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देवून आपल्याला त्यांच्याकडून जास्तीत जास्त विकास करून घ्यायचा आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रातून आ. आशुतोष काळे यांच्या सारखा काम करणारा आमदार पुन्हा निवडून द्या आणि ते सुद्धा मोठ्या मताधिक्याने. असे आवाहन विजय त्रिभुवन यांनी यावेळी केले. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.