महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅन्थरने दिला पाठींबा
महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅन्थरने दिला पाठींबा
महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅन्थरने दिला पाठींबा
राहाता विजय कापसे दि १२नोव्हेंबर २०२४– शिर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित पॅन्थरने पाठींबा दिला असून, मतदार संघातील जनतेला न्याय देण्या-या सक्षम नेतृत्वाला विजयी करण्याचे आवाहन दलित पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी आज मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून त्यांना पाठींब्याचे पत्र सुपुर्त केले. दिलेल्या पाठींब्याबाबत मंत्री विखे पाटील यांनीही त्यांचे आभार मानले असून, महायुतीच्या प्रचारामध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याची विनंती केली आहे.
दलित पॅन्थरच्या वतीने दिलेल्या पत्रकात सोनवणे यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य माणसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ना.विखे पाअील यांची ओळख आहे. कोणत्याही प्रश्नामध्ये मार्ग काढून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम करणारे सक्षम नेतृत्व म्हणून विखे पाटील यांची ओळख ही संपूण्र राज्यात आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील विकासाला गती देणारे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व्यक्तिश: पुढाकार घेण्यात मंत्री विखे पाटील हेच असतात. त्यामुळे त्यांची नाळ ही सामान्य माणसाशी जोडली गेली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी दलित पॅन्थरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयतन करणार असल्याचे सोनवणे म्हणाले.