आम्ही जे बोलतो तेच करतो;पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
आम्ही जे बोलतो तेच करतो;पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
आम्ही जे बोलतो तेच करतो;पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
राहाता विजय कापसे दि १४ नोव्हेंबर २०२४– आम्ही जे बोलतो तेच करतो, निळवंडे पाण्याच्या बाबतीत सुध्दा पाणी आणण्याचा दिलेला शब्द मी पुर्ण करुन दाखविला. या प्रश्नावरून केवळ आमची बदनामी केली गेली. परंतू चार चार वेळा मुख्यमंत्री पदावर राहीलेल्या शरद पवारांना हा प्रश्न सोडविता का आला नाही. याचे उत्तर त्यांनी कधीतरी दिले पाहीजे असे थेट आव्हान महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
केलवड येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मंत्री विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. कालच्या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारने या राज्याला किंवा जिल्ह्याला काय दिले किंवा भविष्यात काय करणार हे सांगायला पाहीजे होते. परंतू केवळ व्यक्तिव्देशातून जनतेचा बुध्दीभेद करायचा हाच त्यांचा प्रयत्न होता. जिल्ह्याच्या विकासात कोणतेही योगदान नसलेल्या शरद पवारांनी पाण्याच्या बाबतीतही या जिल्ह्याचे नुकसान केल्याचा थेट आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, अडीच वर्षापुर्वी या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. जनतेच्या हिताचा एकही निर्णय ते करु शकले नाही. मात्र सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात महायुती सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय करुन, सामाजिक न्यायाच्या प्रक्रीयेची ख-याअर्थाने कृती केली. आज महाविकास आघाडीचा एकही नेता विकासाच्या मुद्यावर बोलायला तयार नाही. लोकसभा निवडणूकीतही खोटा प्रचार आणि फसवणूक करुन त्यांनी यश मिळविले. मात्र आता जनतेच्याही लक्षात सर्व गोष्टी आल्या असून, महायुतीलाच जनतेचे पाठबळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिर्डी मतदार संघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आहे. या भागामध्ये विकासाची प्रक्रीया निरंतर सुरु आहे. एवढ्या मोठ्या कोव्हीड संकटात सामान्य जनतेच्या हितासाठी आरोग्याच्या सुविधा उभ्या केल्या. मात्र आज जे भाषण ठोकायला तुमच्या समोर येत आहेत ते या संकटात कुठे होते असा प्रश्न उपस्थित करुन, तालुक्यातील फुल उत्पादक शेतक-यांना आणि विक्रेत्यांना आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
महायुती सरकारची ही खंबीर साथ शेतक-यांना मिळाली असून, पीक विमा योजने बरोबरच आता सरकार आल्यानंतर कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णयही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-यांना शुन्य रक्कमेचे वील बिल देवून मोफत वीज देण्याचा निर्णयही सरकारने केला असल्याकडे वेधून सरकारने लाडक्या बहीणींचे अनुदान आता २१०० रुपये करण्याचे दिलेले आश्वासन कृतीत उतरेल याची ग्वाही त्यांनी दिली.