आपला जिल्हा

श्री साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाची परवानगी; ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्‍याला मोठे यश

श्री साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाची परवानगी; ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्‍याला मोठे यश

श्री साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाची परवानगी; ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्‍याला मोठे यश

शिर्डी विजय कापसे दि १४ नोव्हेंबर २०२४सन २०२३ मध्‍ये याबाबत साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थापन समितीकडून दाखल करण्‍यात आलेल्‍या ठरावा नुसार तसेच तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर झालेल्‍या सुनावणी नंतर श्री.साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाने आज परवानगी दिल्‍याने फुल उत्‍पादक शेतकरी आणि विक्रेत्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याचे मोठे यश मानले जात आहे.

जाहिरात

कोव्‍हीड संकटापासून साई मंदिराम फुले नेण्‍यास बंदी घालण्‍यात आली होती. त्‍यामुळे फुल आणि हार विक्रेत्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहेत. यासाठी शासन स्‍तरावरही मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु होता. संस्‍थानवर कार्यरत असलेल्‍या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्‍यात येत होती. मात्र निर्णय होत नसल्‍यामुळे फुल उत्‍पादक शेतकरी अनुक्रमे कचेश्‍वर चौधरी, अर्जुनराव चौधरी, संदिप गोर्डे यांनी न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. तर साईबाबा संस्‍थानच्‍या त्रिसदस्‍यीय समितीने दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी ठराव करुन, कर्मचारी पतपेढीच्‍या माध्‍यमातून रास्‍त दरात फुल विक्री करण्‍याची परवानगी मिळावी असे म्‍हणणे न्‍यायालयात मांडले होते.

जाहिरात

यापुर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्‍च्‍ तसेच सर्वौच्‍च न्‍यायालयात झालेली होती. फुल उत्‍पादक शेतकरी तसेच फुल उत्‍पादक तसेच विक्रेत्‍यांच्‍या मागणीची सामाजिक दृष्‍टीकोनातून विचार होण्‍यासाठी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सर्वच स्‍तरांवर आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता. आज संभाजीनगर येथील उच्‍च न्‍यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून न्‍यायालयाने श्री.साईबाबा मंदिर व परिसरामध्‍ये फुले विक्रीस परवानगी देण्‍याचा निर्णय दिल्‍यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

या सुनावणी प्रसंगी फुल उत्‍पादक शेतक-यांच्‍या वतीने जेष्‍ठ विधीज्ञ विनायकराव होन, संस्‍थानच्‍या वतीने विधीज्ञ बजाज आणि शासनाच्‍या वतीने विधीज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. दरम्यान या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला.शिर्डी शहरात फटाक्यांची अतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले.फुल विक्रेत्यांनी मंत्री विखे यांचे शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले.

 

 

 

मंदिर आणि परिसरात फुल विक्री बाबत उच्‍च न्‍यायालयाने निर्णयाचे आपण स्‍वागत करीत असून, या निर्णयामुळे तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार असून मागील काही वर्षात फुल उत्‍पादक शेतक-याचे झालेल्‍या आर्थिक नकसानीचे गांभिर्य न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले होते. यासाठी करण्‍यात आलेल्‍या पाठपुराव्‍याला यश मिळाले असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

 

 

 

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे