आपला जिल्हा

जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देणार-ना विखे पाटील

जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देणार-ना विखे पाटील

जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देणार-ना विखे पाटील

जामखेड विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२५तालुक्यातील खडकत बंधाऱ्याच्या कामा संदर्भात सोमवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेवून महत्वपूर्ण निर्णय घेण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात

मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे खडकत बंधारा पाण्याच्या फुगवट्यामुळे वाहून गेला.या बंधाऱ्याची पाहाणी मंत्री विखे पाटील यांच्यासह आ.सुरेश धस जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अहीरराव यांच्यासह महसूल जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

अतिवृष्टीने नदिपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला.क्षमतेपेक्षा जादा पाणी साठा झाल्याने खडकत क्र१ कोल्हापुरी बंधार्या लगतचा मातीचा भराव वाहून गेला.

मंत्री विखे पाटील यांनी आजच्या पाहाणी दौऱ्यात या बंधाऱ्याच्या दरवाज्यांची दुरूस्ती तसेच मातीचा भराव यांत्रिकी विभागामार्फत पुर्ववत करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.

जाहिरात

तालुक्यातील धनेवाडी मोहरी येथील बंधाऱ्याच्या झालेल्या नूकसानीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी सांयकाळी उशिरा पर्यत केली.ठीकठिकाणी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.पंचनामे करताना हलगर्जीपणा करू नका.पाण्यामुळे शेतात जावून पंचनामे करणे शक्य नाही.त्यासाठी द्रोण तंत्रज्ञानाचा उपयोग करा यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे