आमदार आशुतोष काळेकाळे गट

सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आ.आशुतोष काळेंनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींची भेट

सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आ.आशुतोष काळेंनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींची भेट

सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आ.आशुतोष काळेंनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींची भेट

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ डिसेंबर २०२४:- सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) आ. आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या १९१ कोटी निधीतून सुरु असलेले काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.०४) रोजी दिल्ली येथे येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींची भेट घेवून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे.

जाहिरात

सावळीविहीर फाटा,कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर,  शिर्डी, अहिल्यानगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आलेला आहे. ७५२ जी च्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल १९१ कोटी निधी मिळवून कोपरगावकरांसह या रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे मागील वर्षी काम सुरु झाले. परंतु सुरु असलेले हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून छोटे अपघात देखील घडत आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.

जाहिरात

याबाबत आ.आशुतोष काळे यांनी संसद भवन दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून धीम्या गतीने रस्त्याचे सुरु असलेले काम व त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची कैफियत त्याच्यापुढे मांडून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेवून त्यांना आवश्यक सूचना देवून रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी सहकार्य करावे अशा आशयाचे लेखी निवेदन दिले. ना. नितीन गडकरी यांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेवून तातडीने बैठक घेवून कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम लवकरात पूर्ण व्हावे याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींशी चर्चा करतांना आ.आशुतोष काळे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे