संदीप वर्पे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी मोठे योगदान- ॲड. संदीप वर्पे
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी मोठे योगदान- ॲड. संदीप वर्पे
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी मोठे योगदान- ॲड. संदीप वर्पे
कोपरगाव विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२४–भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वच घटकांसाठी मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करते प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सबंध जगभर त्यांना अभिवादन करण्यात येत असून त्याचा अनुषंगाने कोपरगाव शहरात देखील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अभिवादन करत आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष बापू रांधवणे,ॲड, नितीन पोळ,सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे, जेष्ठ नेते अशोक शिंदे, सुनील साळुंके, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कार्याध्यक्ष रिंकू मगर, ऋतुराज काळे, याकूब अत्तार, सलमान पठाण, सचिन शिंदे आदी सह मोठ्या संख्येने भीमअनुयायी उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. संदीप वर्पे यांनी पुढे बोलताना सांगितले की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना ही अत्यंत अमूल्य देणगी असून सर्व समावेशक असलेल्या ही राज्यघटना जगातील सर्वात महान घटना असून ती प्रत्येक भारतीयांच्या उद्धारासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या राज्यघटनेमुळे सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला असल्याचे प्रतिपादन ॲड. संदीप वर्पे यांनी व्यक्त करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.