आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
येवला प्रतिनिधी दि १४ एप्रिल २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला गुरुकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी प्राचार्य तुषार कापसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सुजाता हेडगिरे, अनुराधा जोरी, भाग्यश्री खानापुरे, मनीषा कुमकर,मनीषा शिंदे,सुवर्णा काळे, ऐश्वर्या कुक्कर, मोनाली सोनवणे, सोनाली घोडके, वैशाली पवार,वैष्णवी शेलार, पौर्णिमा वाघ, कोमल जाधव, क्लर्क श्रद्धा तूपसाखरे, पायल सातभाई आदीनी मनोगत व्यक्त करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या प्रसंगी प्राचार्य तुषार कापसे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले किझ भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा भेदभाव नष्ट केला.तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन कापसे यांनी व्यक्त करत महामानव डॉ आंबेडकरांना अभिवादन केले.





