आ.आशुतोष काळेंच्या रूपाने महाराष्ट्राला उच्च शिक्षित व सक्षम मंत्री मिळावा; माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी ग्रामदैवत अमृतेश्वरास महाभिषेक करून घातले साकडे
आ.आशुतोष काळेंच्या रूपाने महाराष्ट्राला उच्च शिक्षित व सक्षम मंत्री मिळावा; माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी ग्रामदैवत अमृतेश्वरास महाभिषेक करून घातले साकडे
आ.आशुतोष काळेंच्या रूपाने महाराष्ट्राला उच्च शिक्षित व सक्षम मंत्री मिळावा; माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी ग्रामदैवत अमृतेश्वरास महाभिषेक करून घातले साकडे
कोपरगाव विजय कापसे दि ९ डिसेंबर २०२४:- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मतदार संघाचा व राज्याच्या विकासासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी उच्च शिक्षित असलेल्या आ. आशुतोष काळेंच्या रूपाने त्यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश व्हावा याकरीता. आ.आशुतोष काळेंची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी सोमवार (दि.०९) रोजी ग्रामदैवत अमृतेश्वरला महाभिषेक करून प्रार्थना केली.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांना पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक पाच नंबरचे मताधिक्य मिळाले असून ते तब्बल १ लाख २४ हजार ६२४ मतांनी निवडून आले आहे. हे मताधिक्य अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडून आलेल्या १२ आमदारांमध्ये नंबर एकचे आहे. जिल्ह्यात आघाडीवर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर साखर कारखान्याची धुरा सांभाळतांना माजी आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या नेतृत्व व बुद्धी कौशल्यातून कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे.त्याचबरोबर साखर कारखान्यांच्या यंत्रसामुग्री व तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात झालेला बदल स्विकारून स्टीम सेव्हिंग, बगॅस बचत व उच्च प्रतीची साखर निर्माण करून साखर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कारखान्याच्या स्थापनेपासून जवळपास ६३ वर्षाच्या कारखान्याचे दोन टप्प्यात आधुनिकीकरणाचे काम पूर्ण केले. नवीन यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
आ. आशुतोष काळे उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. मागील पाच वर्षांत, त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यामागे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची विशेष भूमिका आहे. आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दुसऱ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ना. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून ना. अजितदादा पवार व ना. एकनाथजी शिंदे यांनी शपथ घेतली असून लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत.या कामांसाठी त्यांना मतदार संघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून चांगली साथ मिळत आहे.आ.आशुतोष काळे यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यांची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून ग्रामदैवत अमृतेश्वर महादेव चरणी महाभिषेक करून ग्रामस्थांनी प्रार्थना केली.यावेळी माहेगाव देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.