स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढा- शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांचे आवाहन
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढा- शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांचे आवाहन
श्रीरामपूर येथे शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२४– विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अडीच वर्षात केलेल्या विकासकामामुळे महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. शिंदे साहेबांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा . येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खा. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मा भाऊसाहेब चौधरी सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्याची तयारी पूर्ण ताकतीने करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
ते रविवारी श्रीरामपूर विश्रामगृह येथे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या आढावा बैठकीत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करताना बोलत होते. यावेळी संजय उर्फ संदेश गांगड मा. शिक्षण मंडळ सभापती श्रीरामपूर नगरपालिका, प्रविण काळे, माजी सरपंच बाळासाहेब दौंड , सदाशिव उंडे , मनोज होंड,गोकुळ गायकवाड, गणेश कदम,राजेंद्र देवकर , शुभम वाघ, प्रदीप वाघ, अशोकराव भोसले सरपंच, विशाल सिरसाठ, दादा कोकणे, शरद भणगे,संदीप दातीर,सागर भोसले,राजेश तांबे, महेश मोदी, लक्ष्मण पाचपिंड, हरी मुठे,राहुल भंडारी,बाबासाहेब भालेराव,संतोष डहाळे, महादेव ओहोळ,शिवनाथ फोपसे, किशोर वाडीले,सागर कुदळे, राजश्रीताई होवाळ, मोनालीताई जाधव, गोपाळे ताई,सविताताई वाडीले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अभिनंदनचा ठराव देखील या बैठकीत संमत करण्यात आला.