श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२४–श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहाने साजरा झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे उप. मुख्याध्यापक रघुनाथ लकारे व पर्यवेक्षक अनिल अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जेष्ठ शिक्षक दिलीप कुडके, एस.सी.बर्डे, कल्पना महानुभाव, राजश्री बोरावके उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, कार्य कारिणी सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दीलीप तुपसैंदर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गायकवाड यांनी केले तर आभार पंकज जगताप यांनी मानले.