राहाता तालुका स्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा यात्रेचे अयोजन- शालिनीताई विखे पाटील
राहाता तालुका स्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा यात्रेचे अयोजन- शालिनीताई विखे पाटील
राहाता तालुका स्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा यात्रेचे अयोजन- शालिनीताई विखे पाटील
लोणी विजय कापसे दि १२ डिसेंबर २०२४– राज्य शहरी आणि ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जनसेवा फौंडेशन लोणी, पंचायत समिती राहाता, कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषि विभाग आणि आत्मा अहिल्यानगर यांच्या वतीने शनीवार दि. १४ ते सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ या दरम्यान राहाता तालुका स्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा याञा २०२४ चे आयोजन करण्यात आले आले असल्याची माहीती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.
या महोत्सवामध्ये महीला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुचे प्रदर्शन- विक्री, खाद्य महोत्सव,पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशु-पक्षी प्रदर्शन, डॉग शो आणि कृषि विषयक माहीतीचा समावेश आणि प्रवरा शैक्षणिक संकुलच्यावतीने सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे.
ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील आणि रणरागीणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, जिल्हा कृषि अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसिलदार अमोल मोरे आदिंसह आत्माचे प्रकल्प संचालक प्रदिप लाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.दशरथ दिघे, उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे, उपविभागीय कृषि अधिकारी विलास गायकवाड, आदीच्या उपस्थित शनीवारी सकाळी ९:३० वाजता होणार आहे.
स्वयंसिद्धा यात्रा २०२४ या महीला बचत गटांसह संपूर्ण जिल्ह्यासाठी पर्वणी ठरावी असे नियोजन करण्यात आले आहे. लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ.बाळसाहेब विखे पाटील क्रिडा संकुलच्या प्रांगणात सुमारे दोनशे स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या काळात बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु, खाद्य महोत्सव, कृषी विषयक माहीती, शेती अवजारे आदींची माहीती या प्रदर्शनात मिळणार आहे. स्वयंसिद्धा यात्रा २०२४ यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गट विकास अधिकारी भाऊसाहेब अहिरे, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.दादासाहेब खोगरे यांनी केले आहे.