परभणी घटनेचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगावात निषेध; दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी
परभणी घटनेचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगावात निषेध; दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी
परभणी घटनेचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगावात निषेध; दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी
कोपरगाव विजय कापसे दि १३ डिसेंबर २०२४– दोन दिवसापूर्वी परभणी येथे संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरुला कडक शासन करत या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे त्याचा शोध घेत त्याचावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या एका माथेफिरूने मंगळवारी सायंकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत आहे व त्या माथेफिरूला कडक कारवाई होऊन त्यास अशी शिक्षा झाली पाहिजे की, अशी घटना दुसरी कोणी करता कामा नये तरी शासनाने व पोलीस प्रशासनाने त्या माथेफिरूला जास्तीत जास्त शासन करावे तसेच या घटनेमागचा खरा मास्टर माईंड म्हणजे मुख्य सूत्रदार कोण असेल तो शोधावा व त्यावर गुन्हा दाखल करावा तर परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निर्दोष भीमसैनिकांवर कारवाई करू नये अशी मागणी या निवेदनाद्वारे सकल आंबेडकरी समाजाने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देत केली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी प्रकाश दुशिंग, अनिल बनसोडे, अनिल रननवरे,शरद खरात,दिपकराव गायकवाड,संदीप पगारे, प्रफुल्ल शिंगाडे, जितेंद्र रनशूर, सुनिल मोकळं, मंगेश औताडे, संजय साठे, संजय कांबळे, नितीन बनसोडे,मनोज शिंदे, दिनेश कांबळे, बाबासाहेब कोपरे, संतोष कोपरे,अशोक शिंदे, मिराताई साळवे, राकेश वाघ,शंकर बिराडे, गोटू पगारे, सुनील डोळस, समाधान मगर, शंकर महांकाळे, रोशन शेजवळ, राजेंद्र घोडेराव, दिनेश कांबळे आदि सकल आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.