उद्योजक रवींद्र वाघ यांच्या अगरबत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद- मुकुंद काळे

उद्योजक रवींद्र वाघ यांच्या अगरबत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद- मुकुंद काळे
ग्रामीण भागात सुरू केला अगरबत्ती निर्मिती व्यवसाय

Kopargaon vijay kapse दि २८ मे २०२६- तालुक्यातील संवत्सर येथील उद्योजक रवींद्र पंडित वाघ यांनी “आर आर प्रीमियम अगरबत्ती” या नावाने सुरू केलेल्या अगरबत्ती उद्योगाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत असलेल्या रवींद्र वाघ यांनी स्वतःची जागा व उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून हा नवीन उद्योग सुरू केला आहे.

सध्या त्यांच्या उद्योगामध्ये गुलाब, मोगरा, लवेंडर, पायनापल यांसह १२ विविध सुगंधांमध्ये अगरबत्ती उपलब्ध असून होलसेल व रिटेल विक्री सुरू आहे. कमी कालावधीत गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले आहे.

या उद्योगाला भेट देऊन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष व भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंद काळे, दिनेश बोरनारे व छाया मुकुंद काळे यांनी शाल, श्रीफल व पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ‘आर आर प्रीमियम अगरबत्ती’ उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहन केले.
या नव्या उद्योग उपक्रमाबद्दल कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र परजणे , सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शेटे , ग्रामपंचायत सदस्य महेश परभणे, रामभाऊ कासार , संभाजी बोरनारे , भाजपा सचिव संदीप मैंद, सचिन शेटे, राजेंद्र बोरनारे, दिलीप कासार व मोहन निकम आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



