आपला जिल्हा

कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर
कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ एप्रिल २०२६शिक्षणाच्या  हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी सदैव झटणारी  राज्यातील एकमेव शासनमान्य शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका माध्यमिक विभागाची ऑनलाइन बैठक संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य सचिव सुनील गाडगे, पुणे विभागाचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष रामराव काळे,  संघटक चंद्रशेखर हासे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन कोपरगाव तालुकाध्यक्ष दिगंबर देसाई व उच्च माध्यमिक तालुकाध्यक्ष नरेंद्र लहिरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनुभवी व सक्रिय शिक्षकांना संधी देत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात
या तालुका कार्यकारिणी मध्ये तालुका उपाध्यक्षपदी संजय गडकर (सोमय्या विद्या मंदिर, साखरवाडी) व विकास भागवत (संजीवनी ग्रामीण विद्यालय, नाटेगाव), सचिवपदी  महेश काळंगे (श्री ग. रा. अवताडे पाटील विद्यालय, पोहेगाव), खजिनदारपदी  नितीन शेटे (विद्या प्रबोधनी, कोपरगाव), प्रसिद्धीप्रमुख पदी मुकुंद हाडोळे (श्रीमान गोकुळचंद्रजी विद्यालय, कोपरगाव) तर कोषाध्यक्षपदी   गोकुळ जपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
या प्रसंगी तालुकाध्यक्ष दिगंबर देसाई यांनी बोलताना सांगितले की, संघटनेला भक्कम दिशा देण्यासाठी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कटिबद्ध राहील.तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांना संघटित करून अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे काम सर्वाना सोबत घेऊन जोमाने करणार असल्याचे सांगितले.

लोगो

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे