आपला जिल्हा

संजीवनीच्या ‘प्लेसमेंट मॉडेल’ मुळे तीस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेकमध्ये नोकरी

संजीवनीच्या ‘प्लेसमेंट मॉडेल’ मुळे तीस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेकमध्ये नोकरी

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज म्हणजे हमखास चांगल्या पगाराची नोकरी’ समिकरण दृढ

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ मे २०२६संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या एकाचवेळी तिस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेक या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची संधी दिली. या सर्वांना कंपनीने आकर्षक पॅकेज दिले. ही जागतिक पातळीवर आयटी सेवा व सॉफ्टवेअर सोल्युशन क्षेत्रातील नामांकित आहे. ट्रेनींग अँड प्लेसमेंट विभागाने विकसित केलेल्या प्लेसमेंट मॉडेल मुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नामांकित कंपन्यात नोकरीची संधी मिळते आहे. यामुळे संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश म्हणजे हमखास चांगल्या पगाराची नोकरी’ हे समिकरण दृढ झाले आहे.

जाहिरात

ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापना सोबत सातत्याने संपर्क साधला जातो. या कंपन्यांतील नवे तंत्रज्ञान संजीवनीच्या विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी हा विभाग पुढाकार घेतो. आवश्यकता भासल्याने विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण तसेच अभ्यासक्रमात या तंत्रज्ञानाचा समावेश देखील केला जातो. या कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध असल्याने स्वाभाविकपणे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आणि मोठ्या संख्येने नोकरीची संधी मिळते.

जाहिरात

या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या हर्ष बढे, रोहित बारगळ, निकित भोगे, हिमांशू छाजेड, ईश्वरी देशमुख, दिपक काळे, कल्याणी कर्डे, अक्षय पेटकर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या श्रेयश भागवत, निकिता भोर, सर्वेश्वर भुजाडे, प्रतिक बुलकुंडे, महेश दहे, भक्ती इमले, वैष्णवी जगताप, संज्योत काकडे, श्रेयश घोडके, शुभम कासार, यश खेडकर, स्वरूप मगर, पूणम मंडलिक, ऋतुजा राजपुत, तेजस्वीनी फासले, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या कुणाल देहरकर, धनश्री गाडे, प्रज्ञा जगताप, भूमी नरोडे, ओम लोखंडे, मुस्तीफा कुरेशी व अनेरी ठाणगे यांची नोकरीसाठी निवड केली.
संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले आहे. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला.यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम, विभाग प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

मी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. विसेन इन्फोटेक ही आयटी व सॉफ्टवेअर कंपनी आहे. मला माझ्या अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट ‘आयओटी बेस्ड सॉफ्टवेअर फॉर लायब्ररी युझेस’ ची या निवडीसाठी मोठी मदत झाली. आधी माझ्या बहिणीचे संजीवनीमुळे करीअर घडले आता माझे करीअर घडले. आई वडीलांचे स्वप्न पूर्ण झाले. संजीवनी शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी म्हणुन येथिल व्यवस्थापन, डायरेक्टर, विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक यांनी माझ्यात जी विविध गुणांची पेरणी केली, ती थेट माझ्या करीअरला गवसणी घालण्यासाठी उपयोगी पडली. –स्वरूप मगर (विद्यार्थी)

मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी इतर मान्यवरही उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे