अमृतवाहिनी न्यूडो स्कूलच्या राजवीर गुंजाळ चा स्केटिंग मॅरेथॉनमधून तिहेरी विश्वविक्रम

अमृतवाहिनी न्यूडो स्कूलच्या राजवीर गुंजाळ चा स्केटिंग मॅरेथॉनमधून तिहेरी विश्वविक्रम
अमृतवाहिनी न्यूडो स्कूलच्या राजवीर गुंजाळ चा स्केटिंग मॅरेथॉनमधून तिहेरी विश्वविक्रम
Sangmner vijay kapse दि १७ मे २०२६- अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी राजवीर गुंजाळ याने ७९ मिनिटे अखंड स्केटिंग मॅरेथॉन पूर्ण करून तिहेरी विश्वविक्रमाची नोंद केली केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका अंजली कन्नावार यांनी दिली आहे.

मॅरेथॉन मधील यशाबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याकरता विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळांमधून सातत्याने संधी निर्माण करून दिली जात आहे.

राजवीर गुंजाळ याने आपल्या चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सलग ७९ मिनिटे स्केटिंग करत हा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या यशाची नोंद ” युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स “, ” जीनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉईस ” आणि “यू.एन. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉईस” मध्ये करण्यात आली आहे.

राजवीरच्या या अभिमानास्पद यशाबद्दल माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ. सुधीर तांबे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव.प्राचार्य अंजली कन्नावार शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले. शाळेच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी राजवीरची ही स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.




