आत्मा मालिक गुरुकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आत्मा मालिक गुरुकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आत्मा मालिक गुरुकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

येवला विजय कापसे दि ३ जानेवारी २०२५– येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे तसेच महिला पालक पूजा कैतके आणि अनिता मुंडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर इयत्ता पहिली मधील ओवी भालेराव हिने सावित्रीबाई फुले यांची माहिती देत उत्कृष्ठ भाषण केले.

मनीषा शिंदे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग सांगितले. सावित्री होत्या म्हणून आज आपण सन्मानाने घराबाहेर पडून शिक्षण घेत आहोत आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्री काम करत आहे ती फक्त सावित्रीबाई यांच्या प्रयत्नांमुळे. प्राचार्य तुषार कापसे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवण्याचे काम सावित्रीबाई यांनी केले म्हणून आज प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे.पूर्वी स्त्री शिक्षणाला इतके महत्त्व दिले जात नव्हते तरीही अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी लोकांचे दगड गोटे,चिखल, शेण अंगावर झेलून अशा परिस्थितीतून स्त्रियांच्या शिक्षणासाठी मार्ग काढला. आज प्रत्येक स्त्रीच्या यशाचे श्रेय हे सावित्रीबाई यांना जाते,असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घोडके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

