विखे-पाटील

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ना.विखेनी घेतली सदिच्छा भेट; शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ना.विखेनी घेतली सदिच्छा भेट; शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ना.विखेनी घेतली सदिच्छा भेट; शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती

लोणी विजय कापसे दि १० जानेवारी २०२५केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकार मध्ये मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहीलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

जाहिरात आत्मा

मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहीती मंत्री विखै पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली.

जाहिरात

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहील्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री अमित शहा आणि ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.

जाहिरात

महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल ना.विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री
अमित शहा यांचे आभार मानथले असून,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे