एस जी विद्यालय कोपरगाव
एस.जी विदयालयाची जारा शेख गणित-विज्ञान पर्यावरण प्रदर्शनात तालुक्यात प्रथम
एस.जी विदयालयाची जारा शेख गणित-विज्ञान पर्यावरण प्रदर्शनात तालुक्यात प्रथम
विद्यालयाच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा
कोपरगांव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२५– सोमवार दिनांक ६ जानेवारी ते बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी कोपरगाव तालुकास्तरीय गणित-विज्ञान पर्यावरण प्रदर्शन संवत्सर येथील जनता विद्यालयात पार पडले.या ठिकाणी पार पडलेल्या प्रदर्शनात श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील इयत्ता १० वी तील विद्यार्थिनी जारा आरीफ शेख गणित विभागात सिलोलीजम अर्थात तर्क,अनुमान या विषयामध्ये नववी,दहावी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून.या विद्यार्थ्यानीला विज्ञान-गणित शिक्षिका श्वेता मालपुरे यांनी मार्गदर्शन केले.
तिचा या यशाबद्दल कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,डॉ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे, राजेश ठोळे,संदीप अजमेरे, दीलीप तुपसैंदर यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे ,पर्यवेक्षक अनिल अमृतकर, गणित-विज्ञान संघटनेचे सचिव कुलदीप गोसावी, सुरेंद्र शिरसाळे, संजय बर्डे, दिगंबर देसाई, निलेश होन, पंकज जगताप, रुपाली साळुंखे, सविता वाडीले, संजीवनी डरांगे, गौरी जाधव, शिल्पा गंगवाल आदी शिक्षक व शिक्षिका,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.