आपला जिल्हा
स्व. भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ रविवारी मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिर
स्व. भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ रविवारी मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिर
स्व. भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ रविवारी मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिर
कोपरगाव विजय कापसे दि १० जानेवारी २०२५– कोपरगाव येथील ठोळे ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक स्व. भागचंद धनराज ठोळे यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर तसेच महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोपरगाव येथील लायन्स, लिनेस व लिओ क्लब, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ठोळे उद्योग समूह व प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले असून या शिबिरात मेडिसिन, शल्यचिकित्साका, नेत्र चिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, दंतरोग चिकित्सा, फिजिओथेरपी, मानसोपचार, एक्स-रे, रक्त व लघवी तपासणी आदीचे या शिबिरात मोफत निदान व उपचार होणार असून या शिबिरात तपासणीनंतर गरज पडल्यास पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार असून प्रवरा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार तपासणीसाठी ने आणण्याची सोय हॉस्पिटल मार्फत मोफत करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.