संजीवनी पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सकडून ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित
संजीवनी पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सकडून ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रीय पुरस्काराने संजीवनीच्या मुकूटात अधिकचा एक मानाचा तुरा
कोपरगांव विजय कापसे दि १० जानेवारी २०२५: इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) या जगातील सर्वात मोठ्या इंजिनिअरींग संस्थेकडून संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकला विविध निकषांच्या आधारावर ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स २०२४’ या पुरस्काराने नुकतेच कोलकत्ता येथे शानदार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्काराने संजीवनीच्या मुकूटात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संजीवनी पॉलीटेक्निक ग्रामिण भागात असुनही विविध पातळीवर विविध कीर्तिमान स्थापित करीत आहे. संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या उपलब्धीचे स्वागत करून प्राचार्य, विभाग प्रमुख, डीन्स, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंजिनिअर बीआरव्ही सुशिल कुमार ( तेलंगणा मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर), तपन मिस्त्रा (निवृत्त इस्त्रो शास्त्रज्ञ ), डॉ. जी. रंगनाथ (आयईआयचे अध्यक्ष ), इंजिनिअर व्ही. बी. सिंग यांचे हस्ते पॉलीटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर व डीन अकॅडमिक्स प्रा. के.पी. जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पत्रकात पुढे म्हटले आहे की आयईआयने पॉलीटेक्निकला सलग ९ वर्षे मिळालेले एनबीए मानांकन, स्कोपस इंडेक्स जर्नलमध्ये शिक्षकांचे प्रसिध्द झालेले शोधनिबंध, शिक्षकांचे प्रसिध्द झालेली पुस्तके, संशोधन, विकास आणि कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन, पीएच.डी व एम टेक शैक्षणिक अर्हता असणाऱ्या शिक्षकांची संख्या, शिक्षकांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मिळालेले पुरस्कार, शिक्षक विकास कार्यक्रमात शिक्षकांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, विद्यार्थी उद्योजक होण्यासाठीचे प्रयत्न व पुरावे, संस्था आणि उद्योग यांच्यातील सामंजस्य करार आणि विद्यार्थ्यांना होणारे फायदे, माजी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, कॅम्पस मधिल विद्यार्थी सुरक्षा, नवकरणिय उर्जेचा वापर, संस्थेस मिळालेले विविध पुरस्कार, संशोधनाबध्दलची पेटेंटस्, विध्यार्थ्यांना संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या , विविध स्पर्धांमधिल विद्यार्थ्यांचा सहभाग आणि मिळविलेली बक्षिसे, इत्यांदी बाबींची पडताळणी केली आणि राष्ट्रीय पातळीवर ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स २०२४’ या पुरस्काराने सन्मानित केले.