माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून भोजापुरचे पाणी पाच नंबरच्या चारीत दाखल
आश्विनाथ गडावर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केले पाणी पूजन
पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ गडाच्या पायथ्याशी भोजपूर पाच नंबर चारीत आलेल्या पाण्याचे पूजन करण्यात आले.यावेळी कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, माजी सभापती अविनाश सोनवणे, ॲड.त्रिंबक गडाख,सरपंच विलास अण्णा सोनवणे, विलास मास्तर सोनवणे, पारेगावचे सरपंच सारंगधर गडाख, संजय गडाख, कैलास गडाख, पुंजाहारी सोनवणे, खंडेराव सोनवणे, सोमनाथ सोनवणे व चिंचोली गुरव पारेगाव परिसरातील सर्व लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापुर धरणाचे पाणी निमोन गणातील विविध गावांमध्ये पोहोचवण्यासाठी थोरात कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले आहेत. दरवर्षी कारखान्याच्या मदतीने हे पाणी विविध गावांमध्ये पोहोचविले जाते. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने धरणामध्ये पाणी असल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन आश्विनाथ गडाच्या पायथ्याशी व चिंचोली गुरव च्या पश्चिमेला असलेल्या पाच क्रमांकाच्या चारीमध्ये हे पाणी सोडले आहे.
यावेळी बोलताना संपतराव गोडगे म्हणाले की, भोजापुर पाणी या भागाला देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात सातत्याने प्रयत्न करत आहेत .सत्ता असो किंवा नसो त्यांचा शब्द हा सरकारमध्ये अंतिम असतो .आणि म्हणून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अश्विनाथ पायथ्याशी पाच नंबर चारी मध्ये आज पाणी दाखल झाल्याने आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या पाण्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तर अविनाश सोनवणे म्हणाले की, पाच नंबर चारीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केली आणि या चारीमध्ये पाणी सोडण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आज त्यांचे स्वप्न सत्यात उतरल्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कधी न वाटणारे पाणी पाच नंबर चालीत आल्याने चिंचोली गुरव पाडेगाव सह पंचक्रोशीतील नागरिक हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञ आहेत. तर त्र्यंबक गडाख म्हणाले की, निळवंडेचे पाणीही माजी मंत्री थोरात यांनी दिली आणि भोजापुरचे पाणी सुद्धा त्यांनीच दिले आहे. काही लोक येथील श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील पण त्यांनी हे ध्यानात ठेवावे की आतापर्यंत त्यांना पाच नंबर चारी कुठे आहे हे सुद्धा माहित नव्हती आणि आज ते अचानक आले कसे असे हि ते म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री थोरात साहेब जिंदाबाद म्हणत जोरदार घोषणाबाजी केली यानंतर अश्विनाथ गडावर जाऊन सर्वांनी पूजा केली
पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी
पाच नंबर चारीला भोजापुरचे पाणी आल्याने नागरिक महिला युवक यांचं वृद्ध नागरिकांनी या चारीवर मोठी गर्दी केली. स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता यावेळी सर्वांनी तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली.