आपला जिल्हा

गोवंश जनावरे, कातडी, गोवंश याच्या सह सुमारे पावणेदोन लाख रुपेयचा मुद्देमाल शहर पोलिसांनी घेतला ताब्यात

गोवंश जनावरे, कातडी, गोवंश याच्या सह सुमारे पावणेदोन लाख रुपेयचा मुद्देमाल शहर पोलिसांनी घेतला ताब्यात

गोवंश जनावरे, कातडी, गोवंश याच्या सह सुमारे पावणेदोन लाख रुपेयचा मुद्देमाल शहर पोलिसांनी घेतला ताब्यात

कोपरगाव विजय कापसे दि १९ जानेवारी २०२५कोपरगाव शहरात विविध ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जाणवरांची कोपरगाव शहर पोलिसांनी सुटका केली आहे.शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर कोपरगाव शहर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून ६ गोवंश जनावरांची सुटका केली आहे.यांचबरोबर ५२५ किलो गोमांस व ३० जनावरांची कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकुण १ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला वेगवेगळया कलमा अन्व्येय एकुण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

जाहिरात

सविस्तर हकीकत अशी की, शनिवार दि.१८ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक,भगवान मथुरे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमी मिळाली की, आयशा कॉलनी, कोपरगाव येथे गोवंश जनावरांची कत्तल होत आहे. तसेच कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवलेले आहे. अशी बातमी मिळाल्याने यांनी अधिनस्त अधिकारी सपोनि आशिष शेळके, सपोनि किशोर पवार, पोसई भुषण हांडोरे, पोहेको हांडोरे व अंमलदार पोहेको किशोर जाधव, पोहेको एकनाथ लिंबोरे, पोहेकी गोपीनाथ कांदळकर, पोहेकी दिगंबर शेलार, पोहेकॉ दिपक रोकडे, पोना तुपे, पोको  गणेश काकडे, पोकों श्रीकांत कुन्हाडे, पोकों प्रकाश कुंढारे, पोकॉ किशोर कुळधर, पोको  गणेश मैड, म.पोको  मंजुश्री त्रिभुवन, मपोकों विजया दिवे अशांना पोलीस ठाण्यात बोलावून घेवून सांगितले की, गोपनीय बातमी मार्फत बातमी मिळाली की, आयशा कॉलनी, कोपरगाव येथे गो वंश जनावरांची कत्तल होत आहे. जनावरे डांबून ठेवलेले आहे अशी माहीती मिळाली असून सदर ठिकाणी छापा टाकुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करायची असल्याने वरील अधिकारी व अंमलदार यांची पोनि भगवान मथुरे यांनी दोन पथक तयार करुन पथकासह आम्ही आयशा कॉलनी कोपरगाव येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता महेबूब कॉलनी, संजयनगर कोपरगाव येथे १५ हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीचे २ जनावरे कत्तलीचे उद्येश्याने बांधुन ठेवलेले मिळून आले. सदरचे जनावरांचो लोकांचे मदतीने सुटका करुन गो शाळेत जमा केले आहे. सदर बाबत पोको  गणेश मैड यांचे तक्रारीवरुन आरोपी तोहीद इरफान कुरेशी रा. संजयनगर, कोपरगाव यांचेविरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गुरजि नंबर १७/२०२५ म.प्रा.स.अधि. १९७६ चे कलम ५,९ सह प्रा.निर्दयतेने वागविणेचा अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) सह म.पो. का. क. ११९ प्रमाणे करण्यात आला आहे.

जाहिरात

आयशाकॉलनी, संजयनगर नगर या ठिकाणी ६० हजार रुपये किंमतीचे ३ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीचे उद्येश्याने बांधून ठेवलेले मिळून आल्याने सदरचे जनावरांचे लोकांचे मदतीने सुटका करुन गो शाळेत जमा केले आहे. सदर बाबत पोकों श्रीकांत कुऱ्हाडे यांचे तक्रारीवरुन आरोपी नामे सत्तार गफार कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचेविरुध्द गु.रजि नंबर १८/२०२५ म.प्रा.स.अधि. १९७६ चे कलम ५,९ सह प्रा. निर्दयतेने वागविणेचा अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जाहिरात आत्मा

त्यानंतर मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे कत्तल होत असलेल्या ठिकाणी हाजी मंगल कार्यालयाचे जवळ आयशा कॉलनी, कोपरगाव येथे जावुन खात्री केली असता पापा फकिरा महंमद कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे पत्राचे सेड मध्ये जनावरांची कत्तल केलेली होती. त्या ठिकाणी जनावरांचे ५० किलो मांस व २० कातडी, वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहीत्य असा एकुण १७ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेवुन गोमांस व जनावरांची कातडीचे सॅम्पल घेवुन कत्तलीचे साहीत्य, बाकी गो मांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरीता नगरपालीका कोपरगाव यांचे ताब्यात देवुन त्याची विल्हेवाट लावली आहे. सदर बाबत पोकों गणेश काकडे यांचे फिर्यादीवरुन आरोपी पापा फकिरा महंमद कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे विरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गु.रजि नंबर १९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९ सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जाहिरात

तसेच हाजी मंगल कार्यालयाचे पाठीमागे रोडचे कडेला आयशा कॉलनी, कोपरगाव येथे सोनु मज्जु कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे पत्राचे सेड मध्ये जावुन झडती घेवुन खात्री केली असता, त्या ठिकाणी गांवंश जनावरांची कत्तल केलेली होती, त्या ठिकाणी जनावरांचे ४० किलो गो मांस व १० जनावरांची कातडी व कत्तलीसाठी लागणारे साहीत्य असा एकुण १० हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन गोमांस व जनावरांची कातडीचे सॅम्पल घेवून बाकी मांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरीता नगरपालीका कोपरगाव यांचे ताब्यात दिले आहे. सदर बाबत पोको तुपार कानवडे यांचे फिर्यादीवरुन आरोपी सोनु मज्जू कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे विरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गू.रजि नंबर २०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५.९ सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जाहिरात

आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव येथील मटन मार्केट या ठिकाणी छापा टाकला असता, सदर टिकाणी आरोपो सोनू मज्जु कुरेशी रा.संजयनगर, कोपरगाव, पापा फकीरा महमंद कुरेशी रा संजयनगर, कोपरगाव,शबीर बशीर कुरेशी रा. सुभाषनगर, कोपरगाव, सत्तार गफार कुरेशी रा. आयशा कॉलनी, कोपरगाव, तोहोद इरफान कुरेशी रा. आयशा कॉलनी, कोपरगाव यांचे कब्जात गो वंश जातीचे ४२५ किलो गोमांस व कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकूण ६५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळून आल्याने सदरचे गोमांस व कातडी मधुन संम्पल राखून ठेवून बाकी गो मांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरीता नगरपालीका कोपरगाव यांचे ताव्यात दिले आहे. सदर बाबत पोकों किशोर कुळधर यांचे तक्रारीवरुन आरोपी विरुध्द कोपरगाव शहर पो.स्टे गुरजि नंबर २१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९ सह म.पो.का.क.११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कारवाई प्रसंगी

एकंदरीत शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहीती प्रमाणे आयशा कॉलनी, संजयनगर कोपरगाव परिसरात व मटन मार्केट या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीसांनी छापा टाकून ०६ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. ५२५ किलो गो मांस व ३० जनावरांचे कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकुण १ लाख ६८ हजार ३०० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपीताविरुध्द वेगवेगळया कलमांतर्गत एकुण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबमें सो, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी  शिरीष वमने  यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक  भगवान मथुरे, सहायक पोनि. आशिष शेळके, सपोनि किशोर पवार, पोसई किशोर हांडोरे, पोहेकॉ किशोर जाधव, पोहेकों दिपक रोकडे, पोहेकॉ लिंबोरे, पोहेकॉ दिंगबर शेलार, पोहेकों कांदळकर, पोना तुकाराम तुपे, पोकॉ गणेश काकडे, पोकों गणेश मैड, पोकों प्रकाश कुंडारे, पोकों किशोर कुळधर, मपोकों मंजुश्री त्रिभुवन, मपोकों विजया दिवे आदींच्या पोलिस पथकाने केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे