ताराराणी मल्टीट्रेड कंपनीच्या वतीने आयोजित मोफत ब्युटी पार्लर कोर्सेसचा अनेक महिलांनी झाला लाभ-जयश्री रोहमारे
ताराराणी मल्टीट्रेड कंपनीच्या वतीने आयोजित मोफत ब्युटी पार्लर कोर्सेसचा अनेक महिलांनी झाला लाभ-जयश्री रोहमारे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२५– महिला मुलींना अल्पावधीतच स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता कोपरगाव तालुक्यात ब्युटी पार्लर क्षेत्रात करू करिअर करू पाहणाऱ्या महिला व मुलींसाठी ब्युटी पार्लरचे शास्त्रीय दृष्ट्या परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने कोपरगावात महाराष्ट्र शासनाचे जिल्हा उद्योग केंद्र अहिल्यानगर, महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ व ताराराणी मल्टीट्रेड कंपनी यांच्यामार्फत राबविल्या गेलेल्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्सेस चा अनेक महिलां मुलींनी लाभ घेतला असल्याची माहिती ताराराणी मल्टीट्रेड कंपनीच्या संचालिका जयश्री रोहमारे यांनी दिली आहे.
जाहिरात आत्मा
हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला मुलींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून त्यात ७० हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे त्या प्रक्रियेची पुढील कारवाईसाठी परिपूर्ण सर्व प्रस्ताव ज्या त्या बँकेकडे पाठवण्यात आला असून या कामी सर्व महिला मुलींना ताराराणी कंपनीच्या संचालिका जयश्री रोहमारे यांनी मार्गदर्शन केले. तर सदरचा उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास मंडळाचे अलोक मिश्रा, प्रकल्प उद्योग निरीक्षक बोरसे सर, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे, ताराराणी मल्टी कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक भाऊसाहेब वाघ, जाधव सर आदींचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व मुली महिलांनी सर्वांच्या आभार व्यक्त केले आहे.जाहिरात
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या गौरी बत्तासे, सोनाली बोराडे,रंजना दहे पल्लवी गव्हाणे,प्रियांका गोसावी, रेणुका जाधव, सुषमा जगताप, राणी जामदार, अर्चना जावळे, पल्लवी खरात, नीलिमा भवर, कीर्ती कुऱ्हे, मनीषा कुऱ्हे, कल्याणी माळवे, नीलंबरी सोनवणे, वैष्णवी पारधी, जास्मिन पठाण, रूपाली साळुंखे, आशा संवत्सरकर, श्रुती संवत्सरकर, रमा शिरसाठ, साधना सोनपसारे, सोनाली सुरासे, स्वाती सूर्यवंशी, पूजा मगर, राजेश्वरी सोनवणे, कोमल वाघमारे, ललिता गिरी, प्रणाली उदावंत, आशा वळवे, केशवमंदा उदावंत, रूपाली मोराळे, मंगल खकाले, पूजा लबडे आदींना लाभ मिळाला आहे.जाहिरात