आपला जिल्हा

केमिस्ट असोसिएशन आयोजित महारक्तदान शिबिरात १८७ दात्यांनी केले रक्तदान

केमिस्ट असोसिएशन आयोजित महारक्तदान शिबिरात १८७ दात्यांनी केले रक्तदान
केमिस्ट असोसिएशन आयोजित महारक्तदान शिबिरात १८७ दात्यांनी केले रक्तदान

कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२५अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सबंध भारतभरातील केमिस्ट बांधवांचे श्रद्धास्थान असलेले जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ वा वाढदिवस सबंध भारतातील केमिस्ट बांधव विविध विधायक उपक्रमाने साजरा करता असून यात प्रामुख्याने ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त एका दिवसात ७५ हजार रक्त पिशव्या संकलन करण्याचा विश्वविक्रम करण्याचा मानस समस्त केमिस्ट बांधवांनी हाती घेतला असून त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी देखील एकत्र येत शुक्रवार दि २४ जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात १८७ दात्यांनी रक्तदान करत देश हितासाठी आपले अमूल्य असे योगदान दिले आहे.

जाहिरात

 या महारक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी स्थान बेट कोपरगावचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते तर प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड, लायन्स क्लबचे डॉ. तुषार गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन कोपरगाव शहरातील व्यापारी धर्म शाळेत ११३ दात्यांनी,  कोळपेवाडी येथील डॉ कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये ३५ दात्यांनी तर  कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज २९ दात्यांनी रक्तदान केले.

जाहिरात आत्मा

 या महारक्तदान शिबिरास  अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, संतोष गंगवाल, विलास आवारे, शामसुंदर डागा, विजय जगताप, आप्पा नवले, कृष्णा आढाव आदी मान्यवरांनी भेटी देत केमिस्ट असोसिएशनच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
या प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज यांनी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक करत आज परत सामाजिक सेवाभावी संस्थांनी एकत्र येत अनाठायी खर्च टाळत असे विधायक उपक्रम राबविणे आवश्यक असून यात रक्तदान हे देशहिताचे महान कार्य असून संबंध देशभरात असे शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे महाराजांनी सांगत आयोजकांचे व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
सदर महा रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी संगमनेर येथील आधार ब्लड सेंटरचे सर्व डॉक्टर अधिकारी पदाधिकारी, तालुका केमिस्ट असोसिएशनचे अधिकारी पदाधिकारी तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व डॉ.कोळपे फार्मसी कॉलेजचे अधिकारी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले या सर्वांचे तसेच रक्तदात्यांचे तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी व सर्व पदाधिकारी सदस्यांनी आभार व्यक्त केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे