विखे-पाटील

भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्‍याचे पाण्‍याचे आवर्तन सोडण्‍याच्‍या मंत्री विखे पाटील यांच्‍या सुचना

भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्‍याचे पाण्‍याचे आवर्तन सोडण्‍याच्‍या मंत्री विखे पाटील यांच्‍या सुचना

भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्‍याचे पाण्‍याचे आवर्तन सोडण्‍याच्‍या मंत्री विखे पाटील यांच्‍या सुचना

जाहिरात आत्मा

लोणी विजय कापसे दि ३ फेब्रुवारी २०२५-  भंडारदरा लाभक्षेत्राकरीता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ पासून सोडण्‍याच्‍या सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी विभागाच्‍या  आधिका-यांना दिल्‍या.

जाहिरात

       या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्‍या   आधिका-यां समवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्‍याची असलेली वाढती मागणी तसेच उन्‍हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून शेतीच्‍या   पाण्‍याबरोबरच पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्‍याच्‍या   सुचना त्‍यांनी दिल्‍या आहेत. त्‍यानुसार जलसंपदा विभागाने ८ फेब्रुवारी २०२५ सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्‍याचे नियोजन केले आहे.

जाहिरात

       लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी आणि उन्‍हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले. या आवर्तनाचा लाभ रब्‍बी पिकांना होईल परंतू या बरोबरीने ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी होणार आहे. उन्‍हाची तिव्रता वाढल्‍याने काही गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍याही निर्माण झाली आहे. या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्‍हावा या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे एकत्रित आवर्तन सोडण्‍याच्‍या सुचना मंत्री विखे पाटील यांनी विभागाला दिल्‍या आहेत

जाहिरात

       उन्‍हाची वाढती तिव्रता लक्षात घेवून पाण्‍याचा अपव्‍यय होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाच्या आधिका-यांनी घ्‍यावी, तसेच शेतक-यांनीही पाण्‍याचा योग्‍य विनीयोग करावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे