आपला जिल्हा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनीच्या १४१ विद्यार्थ्यांचे रक्तदान

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनीच्या १४१ विद्यार्थ्यांचे रक्तदान

एका रक्तदानामुळे तीन जणांचे प्राण वाचतात- डॉ जयश्रीताई थोरात

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६-महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वयं स्फूर्तीने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला असून या शिबिरा अंतर्गत 141 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

जाहिरात

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, एनएसएस चे अधिकारी डॉ जे आर रोकडे, प्रा. एस एस काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. विज्ञान आणि मोठी प्रगती केली असली मात्र रक्त अद्याप तयार करता आले नाही. दिवसेंदिवेश वाढणारी अपघात वाढणारे आजार यामुळे रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. युवकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे कारण आपल्या एका रक्तदानामुळे आपण तीन जणांचे प्राण वाचवतो. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन काम केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सहकार शिक्षण शेती ग्रामीण विकास अशा सर्व क्षेत्रातून केलेले काम हे राज्यासाठी दिशादर्शक असून त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.

जाहिरात

तर  शरयूताई देशमुख म्हणाल्या की, अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन होत असून रक्तदान हे पवित्र कार्य असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी प्राध्यापक डॉ जे.आर रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले. या रक्तदान शिबिरामध्ये 141 विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे