आत्मा मालिक हॉस्पिटल

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथेे मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा 

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथेे मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा 

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथेे मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा 

जाहिरात आत्मा

येवला विजय कापसे दि १६ फेब्रुवारी २०२५विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठान संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला चे अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस  हनुमंतराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथेे मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात

याप्रसंगी मठाधिपती संत चरणदास महाराज, प्राचार्य तुषार कापसे पालक  सोनाली कोटमे व महेश कोटमे,सौ.मयुरी खरडकर व राहुल खरडकर पूजनासाठी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्तिक महेश कोटमे, अन्वेष राहुल खरडकर या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला.आई-वडिलांचे पाय धुवून, पायाला गंध लावून,गळ्यात पुष्प माळा घालून आई-वडिलांची पूजा करण्यात आली. प्राचार्य कापसे यांनी विद्यार्थ्यांना मातृ-पितृ दिनाबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली.१४ फेब्रुवारी हा दिवस पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो; परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हाच दिवस मातृ पितृ दिन म्हणून साजरा केला जातो.आणि हाच आदर्श सर्व विद्यार्थ्यांसमोर ठेवत गुरुकुलाने ही परंपरा चालू ठेवली आहे.

जाहिरात

आपण आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांमुळेच आहोत त्यामुळे आई-वडिलांना कधीही विसरू नका असे सांगितले. प्रत्येकाने रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करूनच कामाला सुरुवात केली पाहिजे. त्यात ते म्हणाले स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी खूपच सुंदर उक्ती त्यांनी वापरली. आपले मनोगतात त्यांनी आदर्श बाळ श्रावण बाळ, भक्त पुंडलिक महाराज यांची मातृ पितृ भक्तीची माहिती सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले, आपला हा जन्म फक्त आपल्या आई-वडिलांमुळेच आहे, ते नाही तर आपण नसतोच, जीवनभर आपण कितीही कष्ट केले किती पैसे कमावले किती मोठे झालो तर ही आपण आई-वडिलांच्या समोर लहान बाळच आहोत, त्यामुळे जरी ज्ञानाच्या कक्षा वाढत गेल्या तरी आपल्या आई-वडिलांचा मान नेहमी जपावा,अपमान करू नये, आई-वडिलांचा न ऐकणारा मुलगा त्यांचा अपमान करणारा मुलगा या जगात तुच्छ आहे, त्याला जग सुद्धा मान देत नाही, आपल्या आई-वडिलांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की ते आपण कधीही पूर्ण फेडू शकत नाही, आई-वडिलांचा प्रत्यक्ष शब्द त्यांचा आदेश मानून आपले जीवन जगावे, त्यांना उलटे बोलू नये, जर बोलत असाल तर हे चुकीचे आहे, आई वडील एकदा या जगातून सोडून गेले की पुन्हा आपल्याला मिळत नाही हे सत्य लक्षात ठेवावे आणि त्यांच्या सोबत एक एक क्षण संरक्षण म्हणून घालवावा, सुंदर जीवन आदर्श व्रत असे जगावे, असे सांगितले.

जाहिरात

पालकांनीही त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या संस्काराबाबत कौतुक केले व आशीर्वाद दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. आई-वडिलांना नेहमी प्रेम व आदर देऊ असा शब्द त्यांनी दिला. वैष्णवी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मातृ-पितृ दिनानिमित्त माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कुमकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे