शहरावरील अतिक्रमणाचे संकट दूर व्हावे म्हणून हाडा यांचे प्रयागराजला साकडे
अतिक्रमण संकटामुळे शहरात कमालीची शांतता तर अनेकांचा होत आहे विरोध
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि १६ फेब्रुवारी २०२५ – गेल्या महिनाभरापासून राज्यात अनेकांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत असून यात कोपरगाव शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांना देखील अतिक्रमण मोहिमेला सामोरे जावे लागणार असून या अतिक्रमणाच्या भस्मासुरातून शहरातील सर्वच व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव शहर युवासेना प्रमुख गगन हाडा यांनी थेट प्रयागराज गाठत साकडे घातले आहे.
जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, मागील १० ते १५ दिवसांपूर्वी कोपरगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील मौनगिरी सेतू ते साईबाबा कॉर्नर, येवला रोड, धारणगाव रोड, गांधी नगर रोड आदी शहरातील सर्वच रस्त्यावर सर्वच प्रकारच्या अतिक्रमणावर खुणा करत गेल्या २ ते ४ दिवसांपूर्वी खुणा केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याची नोटीस दिली असून हे जर निर्धारित वेळेत काढले नाही तर अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे काढण्यात येईल त्यामुळे गेल्या १० ते १५ दिवसापासून कोपरगाव शहरातील सर्वच लहान मोठे व्यापारी भयभीत झाले असून आधीच कोपरगावची संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त होत चाललेली असताना व या आदी कोपरगाव शहरात झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईत अनेक लहान मोठे व्यापारी विस्थापित झाले असून त्यांचे देखील पुनर्वसन झालेले नसतांना पुन्हा एकदा या अतिक्रमण विरोधी पथकाचा भस्मासुर वर डोक काढत असल्याने कोपरगाव शहरातील बाजारपेठेत मोठी शांतता पसरली आहे.
जाहिरात
शहरातील अनेक लहान-सहान दुकानदार हातगाडी अथवा छोट्या टपऱ्या टाकत जीवनावश्यक वस्तूची विक्री करत आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहे अनेकांचे संसार किंवा मुलाचे शिक्षण दवाखाने हे सर्व या व्यवसायातुन मिळणाऱ्या पैशातून भागवत असतात त्यामुळे जर ही अतिक्रमणे काढली गेली तर विकसित होत असलेल्या कोपरगाव शहराची बाजारपेठ उध्वस्त होईलच आणि त्यासोबत बेकारी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे अतिक्रमण काढणाऱ्या प्रशासनाला महादेवाने ही कारवाई थांबविण्याची सुबुद्धी द्यावी जेणेकरून कोपरगावची बाजारपेठ सुखरूप राहील अशी प्रार्थना कोपरगाव युवा सेनेचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी थेट प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगम येथे स्नान करत साक्षात महादेवाला साकडे घातले आहे.
जाहिरात
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर जे संकट ओढवत आहे तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि या संकटातून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य बाळासाहेब ठाकरे यांना लढण्याचे बळ देवो अशी प्रार्थना युवासेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी केली आहे.