ॲड रश्मी कडू यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर
ॲड रश्मी कडू यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि २५ फेब्रुवारी २०२५– नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अहिल्यानगर येथील जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय या सामाजिक संस्थेच्या वातीने कोपरगाव येथील प्रसिद्ध रश्मीज बास्केट या बेकरी शॉप च्या संचालिका ॲड रश्मी मनोज कडू याना राज्यस्तरीय ‘आदर्श उद्योजिका’ पुरस्कार जाहिर झाला आहे.
जाहिरात
कोपरगाव येथील कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या ॲड. रश्मी मनोज कडू या गेल्या दहा वर्षा पासून कोपरगाव च्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्या कोपरगाव येथील प्रेरणा फाऊंडेशन या प्रसिध्द संस्थेच्या उपाध्यक्षा असून या संस्थेमार्फत त्यांनी अनेक सामाजपयोगी उपक्रम राबविले आहे. तसेच त्यांनी अत्यंत कमी कालावधीत कोपरगाव शहरात रश्मीज बास्केट या नावाने बेकरी व्यवसायात पाऊल टाकत या अनेक प्रकारचे स्वाधिष्ट चवदार आकर्षक वेगवेगळ्या फ्लेवर मधील केक कोपरगाव करांना उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांचे हे सर्व केक असंख्य ग्राहकाच्या पसंतीस येत आहेजाहिरात
त्यांचा या सर्व कार्याची व अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या व्यवसायाची दखल घेत अहिल्यानगर येथील जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक या संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने त्यांचा नावाची निवड करून त्यांची उद्योग क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय आदर्श महिला उद्योजिका या पुरस्कारा साठी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी दिले आहे.
जाहिरात
सदर पुरस्कार वितरण सोहळा अनेक नामवंत मान्यवरांचा उपस्थितीत अहिल्यानगर येथे २३ मार्च २०२५ रोजी आयोजित केला आहे. ॲड. रश्मी कडू यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध समाजिक संस्था मित्र परिवार हितचिंतक आदी कडून अभिनंदन होत आहे.ॲड.रश्मी कडू