आपला जिल्हा

जयंती महोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १०१ दात्यांनी केले रक्तदान

जयंती महोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १०१ दात्यांनी केले रक्तदान
जयंती महोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १०१ दात्यांनी केले रक्तदान
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ८ जानेवारी २०२६अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी,अधिकारी व कार्यकर्त्यांनी असे एकूण 101 जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

जाहिरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर झाले. यावेळी 101 नागरिकांनी रक्तदान केले. याप्रसंगी मा.महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक नवनाथ आरगडे, विजय राहणे, मदन आंबरे,योगेश भालेराव,अरुण वाकचौरे, गुलाब देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सेक्रेटरी किरण कानवडे, कार्यालयीन अधीक्षक कृष्णा दिघे, अनिल पाटोळे, अर्पण रक्तपेढीच्या सौ.प्रियांका वनवे,धनाजी माने, श्रद्धा जोगदंड,ज्ञानेश्वर खैरनार आदी उपस्थित होते.

जाहिरात

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संगमनेर तालुक्यात 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कारखाना कर्मचाऱ्यांच्या वतीने 101 जणांनी रक्तदान केले असून यामध्ये कारखाना सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी आतापर्यंत जीवनात 101 वेळा रक्तदान केल्याचा योगायोग झाला आहे. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोहन मस्के यांचा सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विज्ञानाने मोठी प्रगती केली. मात्र अद्याप रक्त निर्मिती करता आली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघातांचे प्रमाण. विविध आजार यामुळे रक्ताची मोठी गरज भासत आहे. राज्यभरात कधी कधी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असून युवकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. रक्तदानामुळे कुणाचे तरी प्राण वाचत असून जगातील हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या संस्कारामुळे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांनी कायम सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दरवर्षी रक्तदान होत असून यावर्षी 101 नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर सेक्रेटरी किरण कानवडे यांनी आभार मानले. या प्रसंगी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे