सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस मुद्देमालासह आरोपी जेरबंद
कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी पोलिसांचे केले कौतुक
कोपरगाव विजय कापसे दि १ मे २०२५– संजय लालचंद जैन कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामधील सचिन वाँच कंपनी घडयाळाच्या दुकान असून फिर्यादी दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपीनी त्यांचा दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घडयाळे घरफोडी करून चोरून नेले. याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.१८९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस ना उघड घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

दिनांक ३० एप्रिल रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं १८९/२०२५ या गुन्हयाचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास, रा.घोडासहन, बिहार व त्याचे इतर ७ साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जि.पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने शिरूर जि.पुणे येथे संशयीतांचा शोध घेऊन सुरेंदर जयमंगल दास, वय ४० वर्षे, रियाज नईम अन्सारी, वय ४० वर्षे, पप्पु बिंदा गोस्वामी, वय ४४ वर्षे, राजकुमार चंदन साह, वय २० वर्षे, राजुकुमार बिरा प्रसाद, वय ४५ वर्षे, नईम मुन्ना देवान, वय ३० वर्षे, राहुलकुमार किशोरी प्रसाद, वय २६ वर्षे, गुलशनकुमार ब्रम्हानंद प्रसाद वय २५ वर्षे, सर्व रा. घोडासहन, ता. घोडासहन, जि. मोतीहारी, राज्य बिहार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांचेकडून ९ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे टायटन, रागा टायटन, टायमॅक्स या कंपनीचे १०० घडयाळे, दोन वायफाय राऊटर, ७ मोबाईल असा एकुण १० लाख ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


ताब्यातील आरोपीना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे ? याबाबत विचारपुस करता सुरेंदर जयमंगल दास याने त्याचे वरील साथीदारांनी मिळुन मागील १५ ते १६ दिवसापुर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकलगेट परिसरात रात्रीचे वेळी मोबाईल शॉप फोडुन मोबाईल फोन चोरले आहेत. चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री माहिती सांगीतली. नमूद माहितीची करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजि बी.एन.एस. कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आरोपीतांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असून गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.




