सोमैया व रोहमारे महाविद्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीचे लैंगिक छळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण विशेष व्याख्यानसत्र

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑगस्ट २०२५– भारताचे संविधान सर्वोच्च आहे. संविधानामुळे विविध कायदे पारित केले जातात. कायदा आणि नियम यामध्ये फरक आहे. रूढी-परंपरांमधूनच कायद्याचा उगम झाला आहे. समाजाने गुण्यागोविंदाने जगावे यासाठी कायदे करण्यात आले आहेत”,असे प्रतिपादन ॲड .मेधा लोढा यांनी केले.

स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या विद्यमाने “तुमचे हक्क जाणून घ्या : लैंगिक छळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानसत्रात ॲड्. लोढा बोलत होत्या.

या प्रसंगी त्यांनी राजस्थान मधील भवरीदेवी यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा प्रसंग कथन केला. तसेच विशाखा गाईडलाईन : 2013 चा महिलांच्या संदर्भातील कायदा, त्याचबरोबर महिलांच्या संदर्भातील विविध कायद्यांची अभ्यासपूर्ण माहितीही दिली. मा. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
समिती प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक करताना समितीची रुपरेषा व त्या अंतर्गत होणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. नीता शिंदे यांनी आभार मानले तर प्रा.मयुरी आहेर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट वर्षा आहेर ,प्रा. विभुते, प्रा. गुडघे, प्रा.खंडीजोड, प्रा. जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.