धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; गावातील कचरा गोळा करत केली होळी साजरी
धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; गावातील कचरा गोळा करत केली होळी साजरी
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२५— कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण व ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे यांच्या संकल्पनेतून धोत्रे गावांत गुरुवार दि १३ मार्च रोजी धोत्रे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण चव्हाण सर्व सदस्य ,ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी सर्वांनी मिळून संपूर्ण धोत्रे गावातील प्लास्टिकचा केर कचरा गोळा करून त्याची होळी करून एक अनोखा उपक्रम केला.
जाहिरात
ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यातून गावातील एकोप्याचे दर्शन झाले. शाळेचा परिसर पसायदान चौक ,वीरभद्र मंदिर परिसर व गावातील सर्व परिसरातील जे आजूबाजूला प्लास्टिक पडलेले होते ते सर्व प्लास्टिक सरपंच यांच्या समावेत सर्वांनीच गोळा केले व प्लास्टिकची होळी करून गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार सरपंचासह सर्व ग्रामस्थांनी केला.जाहिरात
गावाला सुंदरतेचे रूप प्राप्त करून गावाला एक आदर्श गाव करण्याचा मानस लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण व सर्व सदस्य यांनी केला.या स्वच्छते मोहिमेमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले तसेच सर्व शिक्षक वृंद,मुख्याध्यापक यांनी देखील सहकार्य केले त्यातून गाव प्लास्टिक मुक्त कडे नेण्यास मदत झाली त्याबद्दल सरपंच यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देऊन त्यांचे कौतुक केले व शाळेचे मुख्याध्यापक अरूण मुसमाडे ,संतोष पेंढारे,नितीन वायाळ , सतीश जोशी , सागर करडे ,संजय रोकडे , पांडुरंग गोडे ,सचिन भिसे , प्रसुल डोळस , संदीप कडू , विलास अनथें ,गणेश मोरे ,निलेश थोरात , स्टेला गावित आदी सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्यातून गावाची स्वच्छता करण्यात आली असून गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांन गावच्या विकसात खूप मोठे योगदान ग्रामस्थांसह सर्व विद्यार्थी व शिक्षकाचे असल्याचे बोलत सर्वांचे आभार व्यक्त करत कौतुक केले.जाहिरात