सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी म्हणून कोपरगावात आत्मक्लेश आंदोलन
सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी म्हणून कोपरगावात आत्मक्लेश आंदोलन
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२५– गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सबंध भारतभर चर्चेचा विषय ठरलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी या मागणीसाठी कोपरगावात बुधवार दि १२ मार्च रोजी सर्वपक्षीय,सर्व धर्मीय कोपरगावकरांनी न काही खाता पिता आत्मक्लेश आंदोलन केले आहे.
जाहिरात
शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ भरत मोरे, अनिल गायकवाड तसेच विनय भगत या सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असून सरपंच संतोष देशमुख यांची नराधमांनी केलेली अतिशय क्रूरपणे हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी असून यातील आरोपी वाल्मीक कराड, कृष्णा आंधळे आणि इतर आरोपीना फाशीची शिक्षा तत्काळ व्हावी तसेच धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या आत्मक्लेश आंदोलनातून कोपरगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे केली असून दिवसभरात अनेकांनी या आंदोलनास भेटी देत पाठिंबा व्यक्त केला आहे.