आपला जिल्हा

पुढील आवर्तन सुरु होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करा आ.आशुतोष काळेंच्या निळवंडे कालवा अधिकाऱ्यांना सूचना

पुढील आवर्तन सुरु होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करा आ.आशुतोष काळेंच्या निळवंडे कालवा अधिकाऱ्यांना सूचना

पुढील आवर्तन सुरु होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करा आ.आशुतोष काळेंच्या निळवंडे कालवा अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २४ सप्टेंबर २०२६– धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे. मात्र लाभक्षेत्रात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम संपताच पुढील आवर्तन सुरु होण्यापूर्वी निळवंडे लाभ क्षेत्रातील चाऱ्यांचे सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जाहिरात

निळवंडे कालवा लाभक्षेत्रात निळवंडे चाऱ्यांच्या सुरु असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.२४) रोजी निळवंडे कालवा अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेवून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघड दिली आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी हि सर्व कामे वेळेत होणे गरजेचे असून  रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बहादरपूर पाझर तलाव २, रांजणगाव देशमुख तसेच अंजनापूरच्या पश्चिम भागातील खोकड विहीर (चोपडे मळा) येथे व्हाल्व्ह काढण्यात यावा जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना सहजरीत्या पाणी मिळेल. तसेच कालव्यावर वितरिका क्रमांक ४ साठी नवीन चेंबर बांधून वितरिका क्रमांक ३ आणि ४ चे उर्वरित बारे काढण्यात यावे. चढाच्या भागात पाणी पोहचवण्यासाठी तातडीने कंट्रोल सिस्टीम बसवण्यात यावी व मनेगाव आणि वेस- सोयेगाव पाईपलाईनची प्रलंबित जोडणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. सद्यस्थितीत खरीप पिकांची काढणी पूर्ण झाल्यानंतर आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतराच्या काळात चाऱ्यांची राहिलेली सर्व दुरुस्ती व विकासकामे वेगाने पूर्ण करावीत. याच बरोबर  परिसरात होणारी व्हाल्व्ह चोरी आणि पाईपलाईनचे नुकसान रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालवा अधिकाऱ्यांना दिल्या.

जाहिरात

या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कामाची माहिती देताना सांगितले की, मंगलमूर्ती लॉन्सजवळील व्हाल्व्ह पुढील आठवड्यात बसवण्यात येईल तर खोकड विहीर येथील व्हाल्व्हच्या प्रलंबित कामासह इतर सर्व कामे रब्बी हंगामापूर्वी वेगाने पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.यावेळी वितरिका क्र. ३ व ४ चे उपअभियंता आसिफ शेख, टेल राईट वितरिका, वितरिका क्र. ५ व ६ चे उपअभियंता चोपडे, कनिष्ठ अभियंता तुषार मंडलिक, गौरव पवार, शुभम शिरसाठ, सागर येवले, फालोदी कन्स्ट्रक्शनचे अभियंता सूरज पवार, रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते, बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, तात्यासाहेब थोरात, प्रभाकर गुंजाळ, ज्ञानेश्वर गव्हाणे, बाबासाहेब गुंजाळ, गोकुळ कांडेकर, रावसाहेब कोल्हे, संतोष वर्पे, शिवाजी वामन, रवींद्र वर्पे, संदिप थेटे, रंगनाथ गव्हाणे, साहेबराव कांडेकर, राधाकिसन कोल्हे, भारत रानोडे उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे