आपला जिल्हा
पोलीस बांधवांसाठीचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि २३ मार्च २०२५: शहरातील संकल्प फाउंडेशन, डॉ. वाघडकर जनरल हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. “सुरक्षित समाजासाठी सक्षम पोलिस, आणि सक्षम पोलिसांसाठी उत्तम आरोग्य” हे ध्येय समोर ठेवून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.











