आपला जिल्हा

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२५क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर तसेच अहिल्यानगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे हे होते.

जाहिरात

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊराव विर, अहील्यानगर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडके, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रा. मिलिंद कांबळे यांनी केले. याप्रसंगी बोलताना अरुण चंद्रे म्हणाले, की क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हावेत म्हणून आपण सर्वांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे. क्रीडा हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यात सगळे भेद विसरून आपण एकत्र येऊ शकतो. जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर यांनी या स्पर्धांना शुभेच्छा देताना, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक कमविण्यासाठी आमचे सर्वोतोपरी सहकार्य असेल. या महाविद्यालयाने इतकी मोठी स्पर्धा भरवली याचे विलक्षण समाधान आहे या भावना व्यक्त केल्या.

जाहिरात

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठानगे यांनी, महाविद्यालयाची गौरवशाली क्रीडा परंपरा सांगितली व महाविद्यालय क्रीडा क्षेत्रात कसे आगेकूच करत आहे याचा लेखाजोखा मांडला.  अध्यक्षीय समारोप करताना, अशोकराव रोहमारे म्हणाले, की या महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात बहुमोल असे कार्य केले आहे. जगभरातील क्रीडा प्रकारात जे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात येत आहे, ते तंत्रज्ञान महाविद्यालयात आणण्याचे आमचे प्रयत्न आहे.  यावेळी या स्पर्धांसाठी अहील्यानगर जिल्ह्यात प्रथमच अत्याधुनिक असे इलेक्ट्रॉनिक्स तंत्र वापरण्यात आले. या सोहळ्यासाठी उपस्थितांचे आभार प्रा. अभिजित वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. जावेद शाह यांनी केले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे