आपला जिल्हा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोपरगावात  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोपरगावात  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोपरगावात  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ एप्रिल २०२५विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित कोपरगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते तथा अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांनी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जाहिरात
 या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सुरेश आसने, संतोष उर्फ बापू वढणे, सामाजिक न्याय शहराध्यक्ष गौतम बनसोडे, उपाध्यक्ष शुभम शिंदे, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कार्याध्यक्ष रिंकू मगर, शहर उपाध्यक्ष दिनेश पवार,याकूब अत्तार, आसिफ शेख, योगेश डोखे,मोबीन शेख,पंकज पवार, फहीम शेख, नईम शेख आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे कोपरगाव शहरकव तालुका पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भीम अनुयायी उपस्थित होते.

जाहिरात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते तथा अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी बोलतांना सांगितले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले राज्यघटना ही जगातील जगातील सर्वश्रेष्ठ घटना आहे त्याचमुळे त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे संबोधले जाते त्यांनी  समता, बंधुता व स्वातंत्र्य ही मूलभूत तत्वे आपल्याला दिली असुन त्याची अंमलबजावणी प्रत्येकाने कटाक्षाने करावी. भारतीय संविधान हा देशाचा विश्वास आहे. उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली राज्यघटना सदैव काम करत असल्याचे सांगत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे